मुंबईतल्या लालबागच्या राजाचा यंदा गणेशोत्सव साजरा होणार नसल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश मंडळांनी आपापल्या उत्सवात मर्यादा आणली असून लालबागचा राजा मंडळाने थेट गणेशोत्सवच रद्द करत त्याऐवजी यंदा आरोग्योत्सव साजरा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या आरोग्य उत्सवात महत्त्वाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये रक्तदान आणि प्लाज्मादानचा समावेश आहे. यासाठी मंडळाकडून कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे. मंडळाने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
आरोग्योत्सव असा साजरा होणार
प्लाज्मा थेरपीला प्राधान्य देऊन अधिकाधिक रुग्णांना जीवदान देण्याचा संकल्प.
११ दिवस प्लाज्मा आणि रक्तदानाच्या उपक्रमाचे आयोजन.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २५ लाखांचा धनादेश देणार.
यंदा लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना केली जाणार नाही.
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान.
कोरोना लढ्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस बांधवांच्या कुटुंबियांना मदतीचा हातभार.
रक्ताचा तुटवडा जाणवू लागताच १ हजार ५४६ रक्तदात्यांचे रक्तदान
जनता क्लिनिक माध्यमातून आतापर्यंत रुग्णवाहिका, डॉक्टर यांच्या मदतीने दक्षिण मुंबईत जनता क्लिनिक उपक्रम
मंडळातील डायलिसिस सेवा कोरोना संकट काळातही सुरु