गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून 201, पश्चिम रेल्वेकडून 42 आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडून 18 विशेष गाड्या धावत आहेत.या गाड्या 20 सप्टेंबर पर्यंत चालतील.
भारतीय रेल्वेची गणपती विशेष रेल्वे सेवा सुरू झाली आहे. या गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी रेल्वे 261 विशेष गाड्या चालवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेकडून 201,पश्चिम रेल्वेकडून 42 आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडून 18 गाड्या धावत आहेत.रेल्वेच्या म्हणण्यानुसार, या गणपती विशेष गाड्या 20 सप्टेंबरपर्यंत चालवल्या जातील.
देशभरातील विविध ठिकाणांहून धावणाऱ्या गाड्यांसाठीही विशेष असेल. रेल्वेच्या मते, या गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार.अधिका -यांचे म्हणणे आहे की, गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात,त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत अचानक वाढ होते. हे टाळण्यासाठी विशेष गाड्या धावत आहेत.या गाड्या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झाल्या आहेत.स्लीपर क्लास व्यतिरिक्त, या मध्ये अतिरिक्त डबे बसवण्यात आले आहेत.