rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुरुड महोत्सवात दिसणार गौतमी पाटीलचा जलवा

Gautami Patil show in Murud Mahotsav
, गुरूवार, 28 डिसेंबर 2023 (08:55 IST)
पर्यटकांचा सध्या फिरण्याचा मुड आहे. ख्रिसमस आणि थर्डीफस्ट निमित्त अनेक पर्यटक अलिबाग, मुरुडसह रायगड जिल्ह्यात आलेले आहे. संध्याकाळनंतर थोडी हवेत देखील गारवा आहे. मुरुडची हवा मात्र थर्टीफस्टला गरम होणार आहे. कारण सबसे कातील, गौतमी पाटील 31 डिसेंबर रोजी मुरुड महोत्सवासाठी येणार आहे.
 
28 डिसेंबरपासून मुरुड महोत्सव रंगणार आहे. मुरुड नगरपालीकेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असून, यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिन दिवस रंगणार्‍या या कार्यक्रमात खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री उद्य सामंत आणि आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 
शेवटच्या दिवशी म्हणजे 31 डिसेंबर रोजी गौतमी पाटीलचा डान्स ठेवण्यात आला आहे. मुरुड समुद्र किनार्‍यावर रंगणार्‍या या कार्यक्रमामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.दरम्यान, गौतमी पाटीलचे कार्यक्रम तिथे होणारा गोंधळ व राड्यांमुळे चर्चेत असतात. त्यामुळे तिच्या या डान्स कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा असतात. त्यामुळे मुरुड येथे गौतमीच्या कार्यकमाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहीले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाऊचा धक्क्यावर दुर्घटना; दोघांचा मृत्यू, सहा जण बेशुद्ध