Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आता एसटीच्या टिकीटासाठीही डिजिटल पेमेंटची सुविधा

msrtc-st-bus-strike-in-maharashtra
, बुधवार, 27 डिसेंबर 2023 (20:40 IST)
मुंबई । पैसे सुटटे द्या...सुटटे द्या पैसे...एसटीमध्ये कंडक्टरचा सर्रास हा आवाज ऐकायला येतो.. कधी कधी एक, दोन रुपयावरुन वाद होताना दिसतात, कधी पैसे घ्यायचे राहूनही जातात. मात्र येत्या काळात हा आवाज कानावर पडणार नाही. कारण डिजिटल पेमेंटची सुविधा आता एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाशांनाही मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोबाईलमधून फोन पे,गुगल पे सारख्या ऍपचा वापर करून तिकीट काढता येणार आहे.
 
देशात सध्या डिजिटल पेमेंट करणार्‍यांची संख्या वाढली असून अगदी भाजीपाल्या पासून तर विमानाचे तिकीट काढण्यासाठी यूपीआय पद्धतीचा वापर केला जातो.आता हीच सुविधा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने अर्थात एसटीने प्रवास करणार्‍या प्रवाश्यांनाही मिळणार आहे. वाहकाजवळ असलेल्या तिकिटांच्या मशीनमध्येच आता क्यू आर कोड जनरेट होणार असून तुमच्या मोबाईल मधल्या डिजिटल पेमेंटच्या ऍप द्वारे तो स्कॅन करून तुम्ही तिकीट काढता येणार आहे.
 
सुट्टया पैश्यांवरून होणारे वाद टाळण्यासाठी आणि ग्राहकांच्या सोयीसाठी महामंडळाने ही सोय करून दिली आहे.सध्या मात्र मोजकेच प्रवाशी याचा लाभ घेत असून अनेक वाहकानांही याची माहिती नाही. त्यामुळे सर्व बस स्थानक आणि बसमध्ये याचा प्रसार होण्याची गरज व्यक्त होत आहे. सध्या मोनो, मेट्रोमध्ये प्रवाशांना ही सुविधा मिळतेय. राज्यातील सर्वदूर पोहोचणार्‍या एसटीमध्ये ही सुविधा सुरु झाली तर गावागावातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.राज्याच्या कानाकोपर्‍यात कमी पैश्यात आणि सुखकर प्रवासासाठी एसटीची निवड केली जाते. लाखो प्रवासी ही सुविधा वापरत असतात.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चाळीसगाव : तरूणींचे अश्लिल चाळे;आमदार चव्हाणांनी केली कॅफेची तोडफोड, चालकाला घेतले ताब्यात