Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यवतमाळ : समलिंगी विवाह सोहळा संपन्न

यवतमाळ : समलिंगी विवाह सोहळा संपन्न
, शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:14 IST)

यवतमाळमध्ये एका अलिशान हॉटेलमध्ये शहरातला पहिला समलिंगी विवाह सोहळा पार पडला. मूळचा यवतमाळकर असणारा पण सध्या अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या ऋषिकेश साठवणे या तरुणाचं अमेरिकतल्याच एका मित्रावर प्रेम जडलं होतं. हा मित्र मूळचा चीनचा असून व्हीन असे त्याचे नाव आहे. तो देखील याच्याप्रमाणंच अमेरिकेत स्थायिक झालेला. त्याला भारतातल्या अनेक मुलींची स्थळं येत होती. मात्र तो या स्थळांकडं दुर्लक्ष करायचा. आपल्या मित्राशीच लग्न करण्याचा त्याचा हट्ट होता. त्याच्या आईचा अखेरपर्यंत या लग्नाला विरोध होता. अखेर  मोजके पाहुणे आणि मित्रमंडळींसह 30 डिसेंबरला हा विवाह सोहळा पार पडला. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सांगली : अपघातामध्ये ६ पैलवानांचा मृत्यू