Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 March 2025
webdunia

मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले
, शुक्रवार, 12 जानेवारी 2018 (08:57 IST)

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी दुपारी १ वाजता, भाईंदरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना हा अपघात झाला.

भाईंदरमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उतरत असताना, हेलिकॉप्टर चालकाला अचानक केबलची वायर समोर दिसली. ही वायर समोर दिसल्यानंतर हेलिकॉप्टर चालकाने प्रसंगावधान राखून, हेलिकॉप्टर पुन्हा वर नेले आणि दुसऱ्या जागी उतरवले.

हेलिकॉप्टर उतरताना जर चालकाचं लक्ष गेलं नसतं तर मोठा अपघात घडला असता. यानंतर परतताना मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने न जाता, खबरदारीचा उपाय म्हणून, वाहनाने मुंबईला परतले. सीएम देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातातून बचावण्याची ही चौथी घटना आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मारुती कंपनीने कारच्या किंमती वाढल्या