Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आघाडीचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्या : संजय राऊत

आघाडीचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्या : संजय राऊत
, शनिवार, 20 मार्च 2021 (21:05 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवल्यास यूपीए मजबूत होईल, यूपीएचे नेतृत्व बदलून ज्या नेत्याला विरोधक स्वीकारतील अशा नेत्याच्या हाती द्यावे असे सांगतांना आघाडीचे अध्यक्षपद शरद पवार यांना द्यावे, असे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ते नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
देशात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हायची असेल आणि त्यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्ष यावेत असं वाटत असेल, तर युपीएचं नेतृत्व पवारांसारख्या नेत्याने करावं”, असं राऊत म्हणाले आहेत. “आत्तापर्यंत सोनिया गांधींनी हे नेतृत्त्व उत्तम पणे केलं आहे. पण युपीएची ताकद सध्या कमी झाली आहे. सोनिया गांधींची प्रकृती बरी नसते. त्या आता सक्रिय राजकारणात फार दिसत नाहीत. देशात सध्या अनेक प्रादेशिक पक्ष एनडीए किंवा युपीएमध्ये नाहीत, पण त्यांना भाजपविरोधात उभं राहण्याची इच्छा आहे. या पक्षांना युपीएमध्ये आणण्यासाठी शरद पवार हेच नाव मला दिसतंय”, असं राऊत म्हणाले.
 
यावेळी बोलतांना संजय राऊत यांनी जळगाव पालिका निकालांवरून भाजपाने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. जळगाव पालिका निवडणुकीत शिवसेनेनं घोडेबाजार केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. त्यावर “घोडेबाजाराचा आरोप कुणी कुणावर करावा? भाजपानं याआधी घोडेबाजार केला नाही का? पहाटेचा शपथविधी घोडेबाजार नाही तर काय गाढवबाजार होता का?”, असा उलट प्रश्न राऊतांनी केला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केंद्रावर जी लस उपलब्ध असेल ती लस घ्या : पालिका आयुक्त