लातूर: लातूर जिल्हा सतत कोरड्य़ा आणि ल्या दुष्काळाचा सामना करीत आहे शेतकर्यांचे प्रश्न गंभीर बनू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धीरज देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. कोरड्या आणि ओल्या दुष्काळाने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे. रबीचा हंगाम तोंडावर आहे, शेतकर्यांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यांना सरकारी मदत तातडीने मिळणे आवश्यक आहे.
सर्व शेतकर्यांना सरसकट पीक विमा मिळणे आवश्यक आहे. मागचीही राहिलेली मदत द्यावी, शेतकर्यांनी अपप्रचाराला बळी पडू नये, शेतकर्यांना बांधावर मदत मिळायला हवी, लातूर जिल्ह्यासाठी सरकारनं वेगळं पॅकेज द्यावं अशा सूचना आ. धीरज देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकार्यांचा प्रतिसाद अनुकुल होता असंही आ. धीरज देशमुख यांनी सांगितलं.