एमपीएससी परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्याच्या कारणातून पुण्यातील झालेल्या विद्यार्थी आंदोलनाप्रकरणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. २०१९ मध्ये आलेलं सरकार हे विश्वासघाताने सत्तेत आलेलं सरकार आहे, असे म्हणत पडळकर यांनी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केलाय. यावेळी ते म्हणाले, या सरकारचा कॉमन मिनीमन प्रोग्रामपैकी विश्वासघात हा एक प्रोग्राम असून राज्यातील जनतेशी हे सरकार प्रत्येक दिवशी नवीन विश्वासघात करतंय. यामध्ये मराठा आरक्षण असेल तर कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत तर कधी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाच्या बाबतीत तर कधी वीजबील संदर्भात माफी करतो, असं म्हणत सरकार सामान्य जनतेचा विश्वास घात करताना दिसतंय.