केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊतांसह ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांनी आज किंवा उद्या कधीना कधी सरकार पडेल, असा घाणाघात नारायण राणेंनी ठाकरे सरकारवर केला.
दरम्यान, संजय राऊत यांनी हे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेलच असे वक्तव्य केलं आहे. त्याबाबत विचारलं असता राऊत यांनी एकदा तरी २५ वर्षे सत्तेत राहू असा दावा केला होता. ते काय घेऊन बोलतात माहिती नाही. पाणी पितात की अजून काही… अशा शब्दात राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.
तसेच चंद्रकांत पाटील मंत्री बनण्यासाठी शिवसेनाच पाहिजे का? इतर पक्षही आहेत. संजय राऊतांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत काय माझा बॉस आहे का? मी त्याच्या प्रश्नाला का उत्तर देऊ, असेही राणे नारायण राणे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यावेळी नारायण राणे यांना इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर विचारलं असता राज्याने त्यांचे कर कमी करावेत. जेणेकरुन त्यांचे दर कमी येतील, असे राणे म्हणाले. हे सरकार कुठल्याही क्षणी पडेल. त्यासाठी एक महिना, दोन महिने असा वेळ मी देणार नसल्याचे राणे म्हणाले.