Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

नातवाने केली 78 वर्षीय आजीची निर्घृण हत्या, खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरला

Nagpur Lady Doctor Devki Bobde Murder Case. Grandson brutally kills 78-year-old grandmother in Nagpur
, मंगळवार, 30 नोव्हेंबर 2021 (14:05 IST)
नागपूरमधील महिला डॉक्टर देवकी बोबडे यांच्या हत्याकांडाचा नंदनवन पोलिसांनी छडा लावला असून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 78 वर्षीय देवकी जीवनदास बोबडे यांच्या नातवानेच आजीची हत्याचा केल्याचा आरोप आहे.
 
तीन दिवसांपूर्वी खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरत वृद्ध महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. भरदिवसा घडलेल्या या हत्येमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी नातवाला अटक केली आहे. मीतेश पाचभाई असे आरोपीचे नाव आहे.
 
27 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास डॉक्टर देवकी बोबडे राहत्या घरी मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्या घरात एकट्या असल्यामुळे आरोपी घरात घुसल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. तसेच देवकी बोबडे यांचे हात पाय खुर्चीला बांधलेले आणि त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता. गळा चिरुन त्यांची हत्या केल्याचं समोर आलं होतं.
 
लूटमार करण्याच्या उद्देशाने हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला गेला होता, मात्र घरातील साहित्य जसंच्या तसं होता. यामुळे अन्य कारणास्तव हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु नातवाने आजीची हत्या करण्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
 
78 वर्षीय देवकी बोबडे या डॉक्टर होत्या आणि नंदनवन परिसरात गायत्री कॉन्व्हेंटजवळ असलेल्या घराच्या तळ मजल्यावर पतीसह राहत होत्या. देवकी यांचे पती जीवनदास बोबडे हे अर्धांगवायूने आजारी आहेत.
 
देवकी यांची कन्या आणि जावई सुद्धा त्याच घराच्या पहिल्या मजल्यावर राहतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन मुलांसह पती-पत्नीचे मृतदेह, हत्या की आत्महत्या? पोलिसांचा तपास सुरु