Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीएसटीसाठी 17 मे ला विशेष अधिवेशन

जीएसटीसाठी 17 मे ला विशेष अधिवेशन
, बुधवार, 26 एप्रिल 2017 (12:51 IST)

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (जीएसटी) विधेयकासाठी विधानमंडळाचं विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी हे अधिवेशन असेल. विशेष अधिवेशन 17 मे 2017 रोजी घेण्याचा येणार आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 246 (क) मधील तरतुदीनुसार केंद्र व राज्यास वस्तू व सेवांवर कर लावण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्या अधिकारांतर्गत राज्याच्या विधानमंडळाने वस्तू व सेवा कर विषयक विधेयक पारित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी हे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. संबंधित विधेयके विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात ज्या दिवशी मंजूर होतील त्या दिवसाचे सभागृहाचे कामकाज समाप्त झाल्यानंतर विशेष अधिवेशन स्थगित करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येणार आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पॅनकार्ड धारकांनी पॅनकार्ड आधारला लिंक करण्याचे आदेश