Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रात गारपिटीचं संकट; पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा इशारा

महाराष्ट्रात गारपिटीचं संकट;  पुढील तीन दिवस मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचा इशारा
, सोमवार, 7 मार्च 2022 (18:21 IST)
मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील 22 जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे . 7 मार्च ते 9 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 
 
त्याचप्रमाणे मुंबई आणि त्याच्या लगतच्या भागात आणि कोकणात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे . सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतातील भागात पावसाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, उत्तरेकडील चक्री वाऱ्यांमुळे उत्तरेकडील भागातही पावसाची शक्यता आहे. या सर्वाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून 7 मार्च रोजी उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भात आणि 8, 9 मार्च रोजी महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
मुंबई समेत पुणे, अहमदनगर, कोल्हापुर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड़, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपुर, गढ़चिरोली, नागपुर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, धुळे, नंदूरबार, नाशिक, जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
 
मुंबईसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तापमानात वाढ झाली आहे. अशा स्थितीत हवामान खात्याचे तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या मते, 7 ते 9 मार्च दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात मेघगर्जनेसह पाऊस पडेल.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

SBI अलर्ट : एसबीआय ने आपल्या ग्राहकांना अलर्ट केले, चुकून या लिंक वर क्लिक करू नका