Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हसन मुश्रीफ यांनी घेतली शरद पवार यांची भेट

हसन मुश्रीफ यांनी घेतली शरद पवार यांची भेट
, मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (21:03 IST)
भाजप नेते किरीट सोमय्या  यांनी घोटाळ्याचे आरोप केल्यानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.  किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले आहेत.
 
हसन मुश्रीफ यांनी मनी लाँड्रिंग, बेनामी संपत्ती गोळा करणे, तसेच इतर अनेक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मुश्रीफ यांनी प्रथमदर्शनी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचे स्पष्ट झाले असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचंही सोमय्या म्हणाले. दरम्यान, सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी आरोप फेटाळून लावले. किरीट सोमय्या यांनी आपल्यावर केलेले आरोप पूर्पपणे चुकीचे असून मी कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार केलेला नाही, असे सांगतानाच मी किरीट सोमय्या यांचा तीव्र निषेध करतो. तसंच, सोमय्या यांच्यावर कोल्हापूर सत्र न्यायालयात मी १०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले.
 
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील २७०० पानांचे पुरावे ईडीकडे सुपूर्द केलेत. तर दुसरकीडे हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहिकीनुसार सोमय्या यांनी केलेल आरोप आणि सत्य परिस्थिती काय आहे, यासंदर्भात माहिती हसन मुश्रीफ यांनी पवारांना दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नितीन गडकरी म्हणाले - मुख्यमंत्री कधी जाणार याची खात्री नाही