Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 1 April 2025
webdunia

मेन होलमध्ये कुतुहलमधून वाकून पहायला गेला अन् पडला 15 फुट खोल गटारात

he leaned into the main hole and fell into a 15-foot-deep gutter
, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (15:24 IST)
रस्त्यावर  मेन होलचे झाकण चोरट्यांनी चोरुन नेले़ अपघात होऊ नये, म्हणून पोलिसांनी त्यावर बॅरीकेटस टाकलेला तरीही खाली काय आहे, हे पाहण्याच्या कुतुहूलापोटी एक मजूर खाली वाकून पाहू लागला अन पाय घसरुन तो मेन होलमधून थेट 15 फुट खोल जाऊ अडकला अग्निशमन दलाने त्याची काही मिनिटात सुटका केली ही घटना कात्रज चौकाजवळ शनिवारी सकाळी 9 वाजता घडली.
 
विजय बेलभादुर (वय ३९, रा. शनीनगर, आंबेगाव बुद्रुक) असे त्याचे नाव आहे. विजय हा मोलमजुरी करतो. तो मजूरीसाठी जात असताना खाली काय आहे, हे पहात असताना त्याचा पाय घसरला व तो थेट गटारात कोसळला. तेथून जात असलेल्या कुमार कांबळे यांनी त्याचा आवाज ऐकला. तेव्हा विजय खाली कोसळला असल्याचे लक्षात आले. त्यांनी अग्निशमन दलाला कळविले. अग्निशमन दल, पोलीस तातडीने तेथे पोहचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या सहाय्याने फासागाठ करुन काही मिनिटात बाहेर काढले. सिंहगड अग्निशमन केंद्राचे तांडेल पांडुरंग तांबे, जवान सतीश डाकवे, संजू चव्हाण, संदीप पवार, संतोष चौरे यांनी ही कामगिरी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवारांनी केलं नितीन गडकरी यांचं कौतुक