Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांची टीका

खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; ‘त्या’ विधानावर गिरीश महाजनांची टीका
, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:16 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाजप नेते आ. गिरीश महाजन यांचे नाव न घेता मास्तरांचा पोरगा एक हजार कोटींच्या संपत्तीचा मालक कसा झाला? याची चौकशी करा, अशी मागणी केली होती. आता यावरून गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे.
 
एकनाथ खडसे यांच्या पक्षाचे राज्यात सरकार आहे. सरकार त्यांचं ऐकत. त्यामुळे त्यांनी माझ्या संपत्तीची चौकशी करावी. पण त्या अगोदर पळापळ न करता ईडीच्या चौकशीला सामोरे जावे,“ असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले आहे.
 
खडसे यांनी माझ्यावर आरोप केला. मात्र राज्यात खडसे यांच्या पक्षाचे सरकार आहे त्यांनी निश्चित चौकशी लावावी. त्यांनी माझे सर्व खाते उतारे काढावेत. यात जनतेसमोर सर्व काही येईल. मात्र खडसे यांची ईडीची चौकशी सुरू आहे, त्यांचे जावई कारागृहात आहेत. त्यांच्या पत्नीवर आरोप आहेत. परंतु चौकशीला सामोरे न जाता ते पळत फिरत आहेत. विधिमंडळात हात य ताणून ते ओरडत होते? माझा काय गुन्हा? मग त्यांनी आता ईडीच्या चौकशी ला सामोरे जावून सिद्ध करून दाखवावे.
 
मी आजपर्यंत बोलत नव्हतो. आपल्यापेक्षा मोठे असल्याने त्यानी कितीही टीका केली तरी राजकीय सीमारेषा आपण पाळून होतो. मात्र माझ्या वडिलांचे नाव घेऊन आरोप होत असतील आपणही गप्प बसणार नाही. सत्ता गेली म्हणून खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना हायड्रोफोबिया झाला असल्याचे आपले मत असल्याचा आरोपही आमदार महाजन यांनी केला.
 
काय म्हणाले होते खडसे?
 
एकनाथ खडसे यांनी बोदवड येथे एका कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी बोलताना खडसे यांनी आता ईडीचा काहीही संबंध राहिला नसल्याचे म्हटले आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल केला असल्याचे त्यांनी सांगितलं. तसेच यावेळी आपल्याबद्दल अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना खडसे यांनी धारेवर धरले असून गिरीश महाजन यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्यांचे वडील मास्तर होते. त्यांनी हजार बाराशे कोटींची संपत्ती जमवली. त्यांची चौकशी का होत नाही?, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यानंतर रस्त्यांच्या कामाचे नियोजन करणार : मनपा आयुक्त