Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरोग्य विद्याशाखा अभ्यासक्रमाच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून

आरोग्य विद्याशाखा अभ्यासक्रमाच्या परीक्षा 4 ऑगस्टपासून
, शनिवार, 4 जुलै 2020 (08:50 IST)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा शासनाच्या वेळोवेळी प्राप्त निर्देशान्वये व कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव पहाता पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
 
विद्यापीठाकडून उन्हाळी सत्रातील आरोग्य विद्याशाखा अभ्यासक्रमाच्या परीक्षेस दि. 04 ऑगस्ट 2020 पासून प्रारंभ होणार आहे. सध्या  कोविड-19 आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता संसर्ग टाळण्यासाठी विद्यापीठाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परीक्षेचे वेळापत्रक 45 दिवस अगोदर जाहिर करणेबाबत विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आदेशित केले होते. या अनुषंगाने विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील परीक्षा टप्याटप्प्याने घेण्यात येणार आहेत. याबाबतचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाचे संकेतस्थळवर जाहीर करण्यात आले आहे.
 
विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांनी सांगितले की, उन्हाळी सत्रातील पदवीपूर्व अंतीम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक दि. 05 जून रोजी जाहिर करण्यात आले होते तथापी सदर वेळापत्रकात एक दिवसाचा खंड देण्यात आलेला नव्हता. त्या अनुषंगाने पदवीपूर्व अंतीम वर्षाच्या वेळापत्रकामध्ये एक दिवसाचा खंड देऊन दि. 16 जुलै 2020 ऐवजी दि. 03 ऑगस्ट 2020 पासून नियोजित करण्यात आले आहे. तसेच बी.एस्सी इन पॅरामेडिकल टेक्नोलॉजी, डिप्लोमा इन पॅरामेडिकल टेक्नोलॉजी, मास्टर इन पब्लीक हेल्थ न्युट्रीशन, एम.बी.ए. (हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन), एम.एस्सी. (फार्मा. मेडिसिन), पी.जी. डी.एम.एल.टी., बॅचलर इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री, डिप्लोमा इन ऑप्थालमिक, सर्टीफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी या अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा दि. 18 ऑगस्ट 2020 पासून नियोजित करण्यात आल्या आहेत.
 
विद्यापीठाचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये अॅलोपॅथी अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक वगळता अन्य सर्व अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दंत, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी, फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, नर्सिंग, स्पीच लॅग्वेज पॅथोलॉजी अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा दि. 18 ऑगस्टपासून सुरु होणार आहेत. विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा झाल्यानंतर तातडीने त्यांच्या प्रक्टिकल परीक्षा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठ परीक्षा संबंधी अधिक माहिती शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यांगत यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळवरील माहिती अधिकृत समजण्यात यावी असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुत्र्याने घेतला चावा, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल