Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले “हे” संकेत

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले “हे” संकेत
, शुक्रवार, 28 मे 2021 (07:34 IST)
महाराष्ट्रात करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र, काही जिल्ह्यातील पॉझिटिव्ही रेट जास्त असल्याने राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील असेही त्यांनी सांगितले.
 
मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्यातील लॉकडाउनसंदर्भातील चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील २१ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट अजूनही १० टक्क्यांवर आहे. लॉकडाऊनबाबत बेडची उपलब्धता आणि पॉझिटिव्हीटी रेट या दोन्ही गोष्टी फार महत्वाच्या आहेत.त्यामुळे सध्या जे निर्बंध आहेत ते तूर्त उठवले जाणार नाहीत. महाराष्ट्रातला लॉकडाउन वाढवण्यात आला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
 
कॅबिनेट मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचे टोपे यांनी सांगितले. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात लॉकडाउन वाढवणार असून येत्या दोन दिवसांमध्ये लॉकडाउन संदर्भातली नियमावली जाहीर केली जाईल असे सांगितले. लॉकडाउन लगेच काढणे शक्य होऊ शकणार नाही, यावर एकमत झाल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
 
राज्याच्या टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्बंधांच्या शिथीलतेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत तौते वादळासह पदोन्नती आरक्षणावरही चर्चा झाली. मात्र, या आरक्षणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असे राजेश टोपे यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे