Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अहमदनगर-आष्टी रेल्वेला भीषण आग

burning train
, सोमवार, 16 ऑक्टोबर 2023 (16:44 IST)
Heavy fire on Ahmednagar Ashti railway  रेल्वे शिराडोह परिसरामध्ये असताना अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागली आहे.  ही आग लागल्याचे वृत्त समोर येत आहे.  सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.
 
आगीत रेल्वेचे तीन ते चार डब्बे जळून पूर्ण खाक झाले आहेत. अद्याप जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकलेली नाही.
 
रेल्वेला आग लागल्यानंतर काही प्रवाशांनी उड्या मारुन आपला जीव वाचवला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शिराडोह परिसरात ही मोठी दुर्घटना घडली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले.
 
ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही ही रेल्वे  वर्षभरापूर्वीच अहमदनगर आष्टी असे  सुरु करण्यात आली होती. पण या  रेल्वेला म्हणावा तसा प्रतिसादही मिळत नव्हता.
 
अग्निशमन दल घटनास्थळी
अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र आगीत रेल्वेचं प्रचंड नुकसान आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दहा हजाराच्या आत सॅमसंग 5G