Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Heavy Rain :अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू

Heavy Rain :अंगावर वीज पडून शेतकऱ्यांचा मृत्यू
, रविवार, 9 एप्रिल 2023 (12:28 IST)
राज्यात अवकाळी पावसामुळे आणि गारपीट मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसामुळे खराब झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे राज्यात वेगवेगख्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे अंगावर वीज पडून 4 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. हिंगोली, परभणी ,बीड आणि सुर्डीत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मानवत तालुक्यात विजांचा कडकडाटासह पावसामुळे अंगावर वीज पडून एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बीड इंदुमती नारायण होंडे असे या महिलेचे नाव आहे.

शेतात कापसाची वेचणी करताना वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला तर हिंगोलीत पिराजी चव्हाण या शेतकऱ्याचा शेतात हळद काढताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तर महादेव किसन गर्जे शेळ्या चरण्यासाठी गेले असता अचानक पाऊस कोसळला आणि ते झाडाखाली विसावा घेण्यासाठी उभेअसता वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चौथी घटना धुळे  तालुक्यात जुनवणे शिवारात घडली शेतात ज्ञानेश्वर नागराज मोरे हे शेतकरी शेतात गहू काढत असता अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला.   
 
Edited By - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान