श्रावण महिन्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पुढचे 3 ते 4 दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी कोकणात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
अमरावती, भंडारदरा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 4 आणि 5 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदाबाद, पुणे या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
3 आणि 4 ऑगस्ट रोजी पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातही पावसाचा इशारा आहे.