Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता कोकणातही हजेरी लावणार

मुंबईत पुन्हा जोरदार पावसाची शक्यता कोकणातही हजेरी लावणार
, गुरूवार, 19 सप्टेंबर 2019 (10:12 IST)
थोड्या काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा आगमन केले आहे. आर्थिक राजधानी मुंबई येथे मागील दोन दिवसांपासून थांबलेला पावसाने मुंबईसह उपनगरात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. यामध्ये  मुंबईतील लोअर परेल, दादर, प्रभादेवी, लालबाग या ठिकाणी विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळला त्यामुळे,  अनेक सखल भागात पाणी साचण्यास  सुरुवात झाली आहे. तर येत्या येत्या 24 तासात मुंबईसह  कोकणातील किनारपट्टी भागातील असलेल्या रायगड, कोकण, सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिवृष्टीचा हवामान विभागाने इशारा दिला आहे. मुंबईसह उपनगरातही बोरीवली कांदीवली, मालाड आणि गोरेगाव या परिसरातही मुसळधार पाऊस सुरु होता,  अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची धावपळ उडाली, आहे.  विशेष म्हणजे विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू  झाल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अवघ्या काही मिनिटातच अनेक ठिकाणी पाणी साचल्याने (Mumbai Rain) वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागत होता. मात्र येत्या काही तासात जोरदार पाऊस पडणार आहे. गणेश विसर्जनाला थोड्या प्रमाणत पाऊस थांबला होता, तर गणेश उत्सव काळात पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईकरांना मधुमेहाने ग्रासले, दररोज सरासरी २६ मुंबईकरांचा मृत्यू