राज्यात ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात दडी मारली.परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे,पालघर,अहमदनगर,नाशिक, जालना,औरंगाबाद,नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे.तर मुंबईतही पुढच्या काही तासात मुसळधार पाऊस पडेल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात अनेक जिल्हात पाऊस पडत आहे.गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पिक सुकू लागली आहेत.तसेच उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.
दरम्यान, राज्यात महापुराचा फटका बसल्यानंतर कोकणामध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.