Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'या' काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

'या' काळात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
, शनिवार, 15 ऑगस्ट 2020 (08:16 IST)
गणेशोत्सवासाठी रस्तेमार्गाने कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखरुप व्हावा, यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, १९ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी असेल. १८ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.
 
यामध्ये १६ टन व त्यापेक्षा अधिक वजनाच्या वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाळू , रेती व तत्सम गौण खनिज वाहतुकदेखील बंद राहील. याशिवाय, २८ ऑगस्ट सकाळपासून ते २९ ऑगस्ट या कालावधीतही अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पुन्हा बंदी घातली जाणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

७३व्‍या स्‍वातंत्र्य दिनानिमित्त कॉसमॉस-मायातर्फे नवीन शो 'कॅप्‍टन भारत'