Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'ईथे' 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण

'ईथे' 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण
, गुरूवार, 20 मे 2021 (07:35 IST)
महाराष्ट्र हा देशातील सर्वात जास्त कोरोना संक्रमित असलेले राज्य आहे. त्यामुळे  महाराष्ट्रात लसीकरण मोहिमेची गती ही वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान, अमरावतीतील मेळघाटमधील चिंचखेड गाव आता एक असे गाव बनले आहे, जिथे 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या खेड्यातील लोकसंख्या 604 आहे, त्यापैकी 136 लोकं 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. 
 
हे गाव आदिवासी भागात आहे. सुरुवातीच्या काळात लसीबद्दल अनेक अफवा उडाल्या होत्या परंतु येथील ग्रामस्थांची जनजागृती आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह प्रशासनाने पसरवलेल्या जनजागृतीचा ग्रामस्थांवर परिणाम झाला आणि ग्रामस्थांनी कोणतीही भीती न बाळगता ही लस घेण्यास सुरू केले. अफवांमुळे लोक ग्रामीण भागात लसीकरण टाळत असताना, इथल्या लोकांनी खबरदारी घेतली आणि आपले लसीकरण पूर्ण केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुढचे 10 दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे :टोपे