Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नील सोमय्या यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

court
, बुधवार, 20 एप्रिल 2022 (15:27 IST)
आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यानंतर त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. न्यायालयाने नील सोमय्या यांना २८ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं आहे. हे संरक्षण देत असताना आर्थिक गुन्हे शाखेत तीन तास हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
 
या याचिकेवर आज बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने ५० हजाराच्या जातमुचलक्यावर नीस सोमय्या यांना जामीन दिला आहे. जामीन देत असताना न्यायालयाने २८ एप्रिलपर्यंत सोमय्या यांना अटक न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. तर नील सोमय्या यांना २५ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेत हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युक्रेन-रशिया युद्ध : युक्रेनमधील युद्ध पुन्हा तीव्र होईल का? रशियाने हल्ले वाढवले, अमेरिकेने लढाऊ विमाने पाठवली