rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा, संभाजीराजे छत्रपती यांनी दिली माहिती

SAMBHAJIRAJE CHHATRAPATI
, सोमवार, 2 जून 2025 (16:51 IST)
भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरणाकडून उत्खनन कार्य सुरु आहे. या उत्खननांत यंत्रराज उपकरण सापडले आहे. अशी  माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. त्यांनी ही माहिती आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहून दिली आहे.  
दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरणांच्या संयुक्त विद्यमानने रायगडावर उत्खनन प्रक्रिया सुरु आहे.वाडेश्वर मंदिराच्या मध्यभागी असलेल्या ऐतिहासिक वाड्याच्या जागेवर उत्खननच्या या प्रक्रियेत आज गडावर खगोलशास्त्र उपकरण प्राचीन यंत्रराज सौम्य यंत्र सापडले असून हे यंत्र प्राचीन काळापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी, वेळ मोजण्यासाठी वापर होतो. याला यंत्रराज असे ही म्हणतात. 
या यंत्राचा वापर अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुवृत्तचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. सध्या दुर्गराज रायगडाचे बांधकाम करत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
या यंत्रावर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली असून मध्यभागी एक कासव/साप सदृश्य दोन प्राण्यांचे अंकन करण्यात आले आहे. त्यांच्या शेपटीची आणि मुखाची दिशा ओळखायला सोपी व्हावी या साठी वरील बाजूस मुख आणि पूंछ अशी अक्षरे कोरलेली आहे. गडावर सापडलेल्या या ऐतिहासिक अमूल्य ठेवामुळे इतिहासाच्या अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी मोठी संधी असल्याचे म्हटले जात आहे.  
Edited By - Priya Dixit  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धोनी-रोहितने नव्हे तर श्रेयस अय्यरने करून दाखवले, IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिला कर्णधार ठरला