Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 9 April 2025
webdunia

गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना कोरोना

Home Minister Dilip Walse Patil Corona Positive
, गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (10:48 IST)
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिलीये.  त्याचबरोबर संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
 
“कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”, असं ट्वीट दिलीप वळसे पाटील यांनी केलंय.
 
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील या आठवड्यात नागपूर-अमरावतीच्या दौऱ्यावर होते. त्यानंतर आज सकाळी त्यांनी ट्वीट केलं. ज्यात कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, आजपासून आंदोलन तीव्र