Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अवघ्या तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल

अवघ्या तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल
, बुधवार, 21 फेब्रुवारी 2018 (15:16 IST)

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर तासाभरातच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तांबेवाडी येथील वसंत महाविद्यालयाच्या परिसरातील काही जणांच्या मोबाईलमध्ये ही प्रश्नपत्रिका आढळून आली. पण पेपर फुटला असला तरी ही प्रश्नपत्रिका परीक्षा हॉलमधून बाहेर कशी आली, याचा खुलासा झालेला नाही. सेक्शन ए, बी आणि सी या प्रश्नपत्रिका लीक झाल्या आहेत.   

दरम्यान, बारावीच्या परीक्षेदरम्यान पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळाकडून कठोर उपाययोजना करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. कॉपीमुक्त परीक्षेसाठी राज्यभरात 252 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती.  


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला