suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा !

murder
जळगाव :भडगाव तालुक्यातील पाळासखेडे येथे अनैतिक संबंधात पती अडसर ठरत असल्याने प्रियकराच्या मदतीने अपघाताचा बनाव करत पतीचा खून केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रियकरासह पत्नीवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत किशोर शिवाजी पाटील वय ४५ यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील पळासखेडे येथे किशोर पाटील हे व्यक्ती आपल्या पत्नी पुष्पा पाटील हिच्या सोबत वास्तव्याला होते. दरम्यान किशोरच्या पत्नीचे राजेंद्र शेळके महाराज रा. आळंदी जि.पुणे यांच्यासोबत अनैतिक संबंध होते. यामुळे अनेक वेळा या कारणावरून किशोर पाटील आणि पत्नी पुष्पा पाटील यांच्यात वाद होत होते. दरम्यान, अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढण्याचे पत्नी पुष्पा पाटील हिने ठरविले. त्यानुसार प्रियकर राजेंद्र शेळके महाराज याच्या मदतीने नियोजन केले. यात प्रियकर राजेंद्र शेळके याने पैसे देण्याचा बहाणा करून किशोर पाटील याला पळासखेडे ते तरवाडे रोडवर बोलावून घेतले.
 
त्यानुसार किशोर पाटील हा शनिवार ३० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजता घरातून निघून गेला. त्यानुसार आगोदरच दबा धरून बसलेले राजेंद शेळके यांने अपघाताचा बनाव करून किशोर पाटील याला ठार केले. हा प्रकार रविवारी ३१ मार्च रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आला.
 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख, भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार यांच्यासह भडगाव पोलीस पथकाने धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात मृतदेह नेण्यात आला. तांत्रिक मदतीच्या आधारे पोलीसांनी पत्नी पुष्पा पाटील हिला ताब्यात घेतले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अभय पाटील यांचा सामना प्रकाश आंबेडकर आणि भाजपच्या अनुप धोत्रे यांच्याविरोधात