जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरफोडी, दुचाकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशातच शहरातील मारुतीपेठ मधील अलंकार ज्वेलर्स आणि शेजारील नूर पॉलिश सेंटर नावाच्या दुकान फोडून चोरट्यांनी तब्बल 14 लाख 59 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत असे की, शहरातील रामपेठ भागात कुटुंबासह वास्तव्यास आलेले सचिन प्रकाश सोनार (वय-38) यांचे मारुतीपेठ येथे अलंकार नावाचे दागिने बनवण्याचे दुकान आहे. त्याच बाजूला नूर पॉलिश सेंटर नावाचे देखील पॉलिश मारण्याचे दुकान आहे. शुक्रवार 26 जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन्ही दुकान फोडून दोन्ही दुकानातून एकूण 14 लाख 59 हजार रुपये किमतीचे 251 ग्रॅम सोन्याचे मटेरियल चोरून नेला.
हा प्रकार पहाटे 4 वाजेच्या सुमारास उघडकीला आला. दरम्यान सचिन सोनार यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव देऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी 7 वाजता शनिपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर हे करीत आहे.
Edited by -Ratnadeep Ranshoor