Publish Date: Mon, 02 Jan 2023 (21:09 IST)
Updated Date: Mon, 02 Jan 2023 (21:12 IST)
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांना खडे बोल सुनावले आहेत. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात असाही आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. त्यांनी आता औरंगजेबाचं मंदिर उभारावं आणि उद्घघाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं असंही त्यांनी म्हटलंय
काय म्हटलं आहे नरेश म्हस्के यांनी?
जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वेगळा इतिहास कुणी लिहिला असेल तर माहित नाही. कारण जितेंद्र आव्हाड हे कायमच आपल्या सोयीने इतिहास मांडतात. औरंगजेबाला हिंदू धर्माचा तिरस्कारच होता. त्यामुळेच संभाजीराजेंचे अतोनात हाल करत त्यांची हत्या औरंगजेबाने केली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायमच हिंदू धर्माचा आणि हिंदू धर्मातील तत्त्वांचा अपमान केला जातो. छत्रपती संभाजी महाराजांनी मुस्लिम धर्म स्वीकारला नाही त्याऐवजी आपल्या प्राणांची आहुती दिली. मग त्यांना धर्मवीर का म्हणायचं नाही? जितेंद्र आव्हाडांनी आता औरंगजेबाचं एक मंदिर बनवावं आणि उद्घाटन करायला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावं असा खोचक सल्लाही नरेश म्हस्के यांनी दिला आहे. तसंच अशा पद्धतीने औरंगजेबाचे उदात्तीकरण योग्य नाही असंही म्हस्के यांनी म्हटलं आहे.
Edited By- Ratnadeep Ranshoor