Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापुरातील रस्त्यावर I Love You !

कोल्हापुरातील रस्त्यावर I Love You !
, बुधवार, 24 मार्च 2021 (11:28 IST)
प्रेमात लोक वेडी होतात असे नेहमी बोललं जातं. मात्र प्रेमात वेडी असणारी लोक काय करतील याचा काही नेम नाही. असा एक आगळा वेगळा प्रयोग  कोल्हापूर येथील शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती परिसरातील एका प्रियकरांने केला आहे. 'क्यूं की' या हिंदी चित्रपटाप्रमाणे या प्रेमवीराने तब्बल अडीच कि. मी. धरणगुत्ती-जयसिंगपूर मार्गावर ‘आय लव यु’ आणि ‘आय मिस यु’ असे ऑईलपेंटने असे लिहले आहे. मात्र हे कोणासाठी आहे याचा काही पत्ता लागलेला नाही. या प्रियकराने थेट डांबरी रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या ऑईलपेंटने I love you आणि I miss you असं लिहिलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत सार्वजनिकरित्या होळी आणि रंगपंचमीला महापालिकेकडून मनाई