Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत सार्वजनिकरित्या होळी आणि रंगपंचमीला महापालिकेकडून मनाई

मुंबईत सार्वजनिकरित्या होळी आणि रंगपंचमीला महापालिकेकडून मनाई
, बुधवार, 24 मार्च 2021 (10:10 IST)
मुंबईमध्ये होळीचा उत्सव साजरा करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने तसे आदेश जारी केले आहेत. मुंबईमध्ये सार्वजनिकरित्या होळी पेटवायला मनाई करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी रंग खेळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 
 
मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. २०२० मध्येही जेवढे रुग्ण नव्हते, तेवढ्या नव्या रुग्णांची संख्या आता मुंबईत वाढू लागली आहे. मुंबईमध्ये ३ हजार ५१२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हॉटेल-रेस्टॉरंट आणि बारमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणं बंधनकारक