नागपूर जिल्हाधिकारी विमला आर. यांनी लसीकरणासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र, राज्य, निमशासकीय कार्यालयांना लसीकरणाबाबत महत्वाचे निर्देश दिले आहेत. लसीकरण नसेल तर पगार नाही, प्रवेश नाही. सवलत, लाभ, योजना आदींमध्ये सहभागासाठी लसीकरण अनिवार्य असेल. त्यासाठी 30 नोव्हेंबरच्या आत 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ठ पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोना विरुद्ध लढ्यात लसीकरण हे महत्वाचे शस्त्र आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांनी डोस पूर्ण केल्याशिवाय वेतन नाही.
सोबतच कॉलेज प्रवेश, परीक्षेतील सहभागासाठीही लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहेत. त्यासाठी मिशन मोडवर कारम करण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचन भवनमध्ये या संदर्भात केंद्र, राज्य, शासकीय आणि निमशासकीय अशा सर्व आस्थापनांच्या विभाग प्रमुखांची यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.v