Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान 6 लोकसभेच्या जागा जिंकू शकतो-प्रकाश आंबेडकर

prakash ambedkar
, शनिवार, 2 मार्च 2024 (07:59 IST)
लोकसभा आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान 6 लोकसभेच्या जागा जिंकू शकतोनिवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे उपस्थित होते. मात्र यानंतर  त्यांनी आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान 6 लोकसभेच्या जागा जिंकू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. नागपूर येथील रवी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सध्या महाविकास आघाडीत जागा वाटपावरून काँग्रेस व उद्धव ठाकरे गटात घमासामान सुरू आहे. आधी त्यांची चर्चा होते व नंतर ते आम्हाला बोलावतात. या चर्चेत सध्या आम्ही उपरे आहेत. त्यामुळे आम्ही राज्यभर 10 मार्चपर्यंत 42 मतदारसंघात वंचितच्या जाहीर सभा घेतल्या आहेत. त्यामध्ये आमच्या विचारांचे लोक किती आहेत हे दिसून आले आहे. विशेष म्हणजे कोणत्याही सभेत आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही. मात्र, तरीदेखील स्वतःच्या पैशाने सभेला येणारा माणूस येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो. त्यामुळे आमच्याकडील गर्दी पाहता आम्ही स्वतंत्र लढलो तर किमान लोकसभेच्या 6 जागा जिंकू, असा आमचा विश्वास असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ठाणे स्टेशनवर दोन नवे पादचारी पूल सुरू