मराठा आरक्षणाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बळ (EWS) प्रवर्गाला मोठा फटका बसला आहे. मराठा आरक्षणाचा तिढा अद्यापही मार्गी लागलेला नाही. इतर मागासप्रवर्गातून, ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष सुरूच आहे. दरम्यान राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी कक्ष) अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एसबीसीमुळे ईड्ब्ल्यूएस प्रवेशावर झाला आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केलेल्या अहवालातून बाब उघडकीस आली असून अहवालानुसार, 2023 -24 वर्षात राज्यात EWS प्रवर्गासाठी 11 हजार 184 जागा होत्या. या जागांवर एकूण 7 हजार 352 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला टक्केवारी 65 टक्के होती. तर 2024-25 मध्ये 12 हजारांहून अधिक जागा झाल्या.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्गातून अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, आणि विधी शाखेत अभ्यासक्रमांत प्रवेश दिला जात आहे. तर इतर मागासप्रवर्गातून काहींचे अर्ज दाखल करण्यात आले आहे. याचा सर्वात जास्त फटका EWS प्रवर्गाला बसला असून या प्रवर्गात 15 टक्क्यांनी घट झाल्याचे समोर आले आहे.
खरंतर फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सामाजिक आणि आर्थिक दृष्टया मागासवर्गीय प्रवर्गातून एसीबीसी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दुर्बल घटकातील EWS प्रवर्गात घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये 15 टक्क्यांनी घट झाली असून याचा अहवाल उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सादर केला आहे.
मराठा समाजातील मुले यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये कृषी, विधी आणि अभियांत्रिकी सारख्या काही अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी EWS चे प्रमाणपत्र दिले. तहसीलदार कार्यालयाकडून झालेल्या तांत्रिक चुकीमुळे या विद्यार्थ्यां प्रमाणपत्र देण्यात आले. आणि विद्यार्थ्यांनी EWS प्रवर्गातून प्रवेश घेतला. तरीही या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची टक्केवारी कमी झाल्याचे सूत्रांनी माहिती दिली.