Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे महत्वपूर्ण विधान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री  फडणवीसांचे महत्वपूर्ण विधान
, सोमवार, 13 जानेवारी 2025 (20:37 IST)
भारतीय जनता पक्षाचे 2 दिवसीय महाअधिवेशन शिर्डीत झाले.या वेळी भाजपचे प्रमुख नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते. या अधिवेशनात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी बाबत चर्चा करण्यात आली. पक्षाच्या महाअधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी बाबत महत्वपूर्ण विधान केले आहे.

फडणवीस म्हणाले, सर्वोच्च न्ययालयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचा निर्णय झाला असून निवडणुका पुढील तीन ते चार महिन्यांत होउ शकतात. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी महायुतीला सज्ज व्हाव  लागणार. 
भाजपच्या यशामागे विकासाची कामे, पारदर्शक कारभार, प्रमाणिकपणा आहे. हे यश जनतेच्या विश्वासचे प्रतीक आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर देखील विकासाच्या जोरावरच यश मिळवायचे असे निर्धार केले आहे. 
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप गेल्या 30 वर्षात तीन वेळा 100 पेक्षा जास्त जागा मिळवणारा  
हा एकमेव पक्ष आहे. भाजपने यश मिळवला आहे. 

या वेळी त्यानी विरोधकांवर निशाना साधला. ते म्हणाले, साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र ज्यांना समजला नाही त्यांची अवस्था विधानसभेत काय होती ते आपण बघितले आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुकांना सामोरी जाण्यासाठी भाजप पक्ष सज्ज असून त्याने तयारी सुरु केली आहे. महापालिकेत देखील यश मिळवायचे आहे. असे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने गावस्कर-कांबळींचा गौरव केला