रामगिरी महाराजांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्य वरून नाशिक व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. रामगिरी महाराजांना चोख उत्तर देण्यासाठी आता एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे आज छत्रपती संभाजी नगर ते मुंबई पर्यंत तिरंगा रॅली काढत आहे.
आमदार नितेश राणे आणि रामगिरी महाराजांवर राज्य सरकार कारवाई का करत नाही असा प्रश्न ते विचारत असून त्यासाठी त्यांनी मुंबईकडे रवाना होत आहे.
एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे की, रामगिरी महाराजांनी प्रक्षोभक वक्तव्य केले होते. 60 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत परंतु अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. रामगिरी बाबांच्या केसालाही धक्का लावू देणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात,
अशा स्थितीत संविधान कुठे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संविधानाची प्रत देण्यासाठी मुंबईच्या दिशेने निघालो आहोत, आज महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी रॅली निघत आहे.
आम्हाला राज्य सरकार कडून योग्य निर्णयाची अपेक्षा होती मात्र असे काहीही झाले नाही. आम्ही कुठला पक्ष म्हणून नाही तर समाज सेवक म्हणून मुंबईला निघालो आहोत.