Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बीडमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रांचा वाहनांचा ताफा अडवला

बीडमध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्रांचा वाहनांचा ताफा अडवला
, शुक्रवार, 18 जून 2021 (18:53 IST)
महाराष्ट्राच्या बीड मध्ये आज आरोग्य विभागातील काही कर्मचाऱ्यांनी कोरोनाकाळात पगार थकविल्यानं आणि कामावरून कमी केल्यानं परिचारिका आणि वार्डबॉय यांनी आंदोलन करून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या वाहनांचा ताफा अडवला.
आरोग्य कर्मचाऱ्यांना आरोग्य मंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ दिले नाही म्हणून त्यांनी संतप्त होऊन आंदोलन करत उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्रींच्या वाहनांचा ताफा अडवला .
 
कोरोना काळात या आरोग्य कर्मचाऱ्यांना कंत्राटीस्वरूपी कामावर ठेवण्यात आले होते.आणि अय कोरोना कमी झाल्यावर त्यांना कामावरून काढण्यात आले आहे. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे असे आहे की
ज्यावेळी आरोग्य विभागात कामासाठी भरती निघेल तेव्हा त्यांचा विचार आधी केला जावा.आणि त्यासाठी त्यांनी आज आरोग्य मंत्री आणि उप मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा वेळ मागितला होता.परंतु वेळेअभावी त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाहनांचा ताफा अडवला.आणि म्हणाले की आमच्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचाव्या यासाठी आंदोलन केले. या साठी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अडवले.मात्र कर्मचाऱ्यांचा गोंधळ सुरूच होता. 
त्यामुळे पोलिसांनी या कर्मचाऱ्यांवर लाठीमार केला .हे आरोग्य कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचे होते.त्यामुळे त्यांना आता कामावरून कमी करण्यात आले आहे.संतप्त कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देण्याची मागणी केली परंतु त्यांना उपमुख्यमंत्र्यांना काही भेटता आले नाही आणि त्यामुळे संतप्त होऊन आरोग्य कर्मचाऱ्यांनी उपमुख्य मंत्री आणि आरोग्य मंत्रींच्या वाहनाचा ताफा अडवला.पोलिसानी या आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीमार केला. या लाठीमारा दरम्यान काही महिला कर्मचारींना देखील मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चांगली बातमी : आता सोनं झालं स्वस्त आजच खरेदी करा