Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हिंगोलीत मोबाईलला स्टेट्स ठेवत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

suicide
, सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (09:16 IST)
हिंगोलीत एका तरुणाने स्वतःचे मतदान कार्ड मोबाईलच्या स्टेट्स वर लावून त्यावर स्वतःला भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तर स्टेट्सच्या दुसऱ्या पोस्टवर त्याने साईमंदिराच्या मागे सेनगाव असं लिहिले आहे. नवल जयराम नायकवाल असे या तरुणाचे नाव आहे. नवलच्या वडिलांच्या नावावर कारेगाव शिवारात पाच एकर शेत आहे. शेतात सोयाबीन, कापूस आणि इतर पिके लावली आहे. त्यांनी पेरणीसाठी सुमारे ७० हजाराचे कर्ज घेतले असून पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने कर्ज कसे फेडायचं या चिंतेत नवल राहायचा. त्याने वडिलांच्या मदतीसाठी गावात हमालीचं काम सुरु केले होते. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात कारेगाव इथे राहणारा नवल शनिवारी शेतात जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला आणि नंतर घरी परत आलाच नाही. रविवारी सेनगाव शहरातील साईमंदिराच्या जवळच्या बाभळीच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसात भरतीची तयारी करत असलेल्या काही तरुणांनी त्याचे मृतदेह झाडाला लटलेल्या अवस्थेत पाहिल्यावर त्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून नवल च्या कुटुंबियांना कळविले. पोलिसांनी प्रकरणाची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून मयत मावळचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठविले आहे. 

Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पन्हाळा : मामाच्या निधनाच्या नैराश्यातून भाचीची गळफास लावून आत्महत्या