कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या
, शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 (13:33 IST)
कोल्हापुरातून पोटच्या मुलाने आपल्याच जन्मदात्या आई वडिलांची निर्घृणपणे हत्या केल्याची एक धक्कादायक घटना महावीरनगर येथे घडली आहे. घटनेननंतर आरोपी मुलाने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. विजयमाला नारायण भोसले(70), नारायण गणपतराव भोसले (78) असे मयत झालेल्यांची नावे आहेत. तर आरोपी मुलाचे नाव सुनील नारायण भोसले (48) आहे.
सदर घटना आज 19 डिसेंबर रोजी सकाळी घडली आहे. घराच्या वाटणीचा कारणावरून मुलाने आई वडिलांचा खुरपं , दगड,काठीने वार करत हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नारायण भोसले आपल्या पत्नी व मुलासह महावीरनगर येथे वास्तव्यास होते. त्यांना तीन अपत्ये असून मोठा मुलगा चंद्रकांत आणि मधला संजयचे सराफ्याचे दुकान असून ते दोघे कामास्तव बाहेर गावी असतात. तर आरोपी मुलाचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा व एक मुलगी असे दोन अपत्य आहे. आरोपी सुनील सतत आपल्या बायकोला त्रास देत असे. त्यामुळे ती मुलांसह माहेरी राहते. आरोपी आई वडिलांसह राहायचा.
गेल्या काही महिन्यांपासून घराची वाटणी करण्याची मागणी करत तो सतत आई वडिलांशी भांडण करायचा. घराची वाटणी करणे शक्य नसल्याने आई वडिलांनी त्याची मागणी फेटाळली.
त्याला राग आला आणि त्याने आज शुक्रवारी सकाळी 5:30 वाजेच्या सुमारास वडील झोपते असताना त्यांच्या डोक्यावर काठीने हल्ला करत जखमी केले. नंतर दगडाने ठेचून खिडकीचे काच फोडून हाताची नस कापली. आई नळाला पाणी आल्याने बाहेर मोटर सुरु करण्यासाठी गेली. घरात आल्यावर तिला काही समझेल इतक्यातच सुनील ने त्यांच्यावर हल्ला केला आणि काच ने हाताची नस कापली.
या घटनेनन्तर सुनील घराबाहेर पडला आणि काहीच झाले नाही असे जाणवत शेजाऱ्यांना हस्तमखाने केला. काही वेळांनंतर त्याने स्वतः हुपरी पोलिसांत जाऊन घडल्याची कबुली दिली. पोलिसांची खात्री करत त्याला ताब्यात घेतले आहे.
पुढील लेख