Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

मुंबईत बेस्ट बसने दुचाकीला उडवलं, चिमुकलीचा जागीच मृत्यू

a two-wheeler was blown over by a BEST bus
, बुधवार, 26 जून 2024 (09:11 IST)
मुंबईच्या बोरिवली परिसरात मंगळवारी पहाटे एका भरधाव वेगाने जाणाऱ्या बेस्ट बस ने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात 5 वर्षाच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर मुलीचे आजोबा गंभीर जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

सदर घटना बोरिवली रोडवर शिंपोली रोड इटोपिया टॉवर जवळ घडली आहे. मंगळवारी पहाटे चिमुकली आपल्या आजोबांसह दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या बेस्टच्या बस ने दुचाकीला धडक दिली. बसने दुचाकीला फरफटत नेलं त्यात चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा गंभीर जखमी झाले. 

अपघातांनंतर रस्त्यावर लोकांची गर्दी झाली. पोलिसांना माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले त्यांनी वाहतूक सुरळीत केली. अपघातात जखमी झालेल्या आजोबाना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. पोलिसांनी या प्रकरणात बेस्टबसचा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यातील 4 विधानपरिषदेसाठी मतदान आज