पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता रंगायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षानं विजयाची गणितं जुळवायला सुरुवात केली आहेत.
भाजपमध्ये विरोधी पक्षातील इनकमिंग सुरू झालं आहे. भाजपनं पंजाबच्या विरोधी पक्षांना मोठा धक्का दिला आहे. दोन आमदार, एक खासदार आणि एक माजी आमदार यांना भाजपनं पक्षप्रवेश दिला आहे. तसंच माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगियानंदेखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये प्रवेश घेतलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस आणि अकाली दलातील नेत्यांचाही समावेश आहे. काँग्रेसचे फतेहसिंग बाजवा आणि बलविंदरसिंह लाडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर अकाली दलचे गुरतेज सिंग घुडियाना, जगदीप सिंग अशा नेत्यांनीही भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाबमधील भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगियानंही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 2001 ते 2007 दरम्यान त्यानं भारतीय क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं.