Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नितीन देसाई मृत्यू प्रकरणी, गुन्हा रद्द करण्यासाठी आरोपींची हायकोर्टात धाव

Nitin desai
, शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (21:21 IST)
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणी दाखल केलेले गुन्हे रद्द करा अशी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. याबाबत आज सुनावणी होणार होती. सुनावणीसाठी देसाई कुटुंबीय कोर्टात हजर होते. पण आता ही सुनावणी 13 ऑक्टोबरपर्यंत तहकूब झाली आहे.
 
पोलिसांनी ईसीएल फायनॅन्सच्या पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे रद्द करा अशी याचिका ईसीएलचे अध्यक्ष रशेश शाह, सीईओ राजकुमार बन्सल आणि Interim resolution professional जितेंद्र कोठारी यांनी केली होती.
 
नेमकं प्रकरण काय?
नितीन देसाई आत्महत्या प्रकरणातील याचिकेवर आज सुनावणी होणं अपेक्षित होतं. पण काही कारणाने आणि गणपती विसर्जनामुळे खालापूर पोलिस ठाण्यातील जे तपास अधिकारी आहेत ते आज कोर्टात उपस्थित राहू शकलेले नाहीत. त्यामुळे सरकारी वकिलांनी यासंदर्भात वेळ मागवून घेतला आहे. त्यामुळे आजची सुनावणी 13 ऑक्टोबरपर्यंत तहकूब झाली आहे. तसेच नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे जे आरोपी आहेत त्यांना कोणताही अंतरिम दिलासा किंवा अटकेपासून संरक्षण न देता ही सुनावणी आता 13 ऑक्टोबरपर्यंत तहकूब झाली आहे.
 
नितीन देसाई यांनी आपला एनडी स्टुडिओ शुन्यातून उभा केला होता. त्यात कर्जबाजारी झाल्यामुळे आणि ईसीएलचा निकाल त्यांच्या विरोधात लागल्यामुळे नैराश्येत जात त्यांनी आत्महत्या केली होती.
 
त्यामुळे या सर्वांविरोधात नितीन देसाई यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हा गुन्हा रद्द करावा आणि अटकेपासून संरक्षण द्यावं यासाठी आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर आता 13 ऑक्टोबरला सुनावणी होईल.
 
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणात पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांच्याकडून ईसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईस ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर खालापूर पोलीस ठाण्यात त्या पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्या पाच जणांनी मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एडलवाईज कंपनीचे चेअरमन रशेष शहा यांच्यासहित पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रायगडमध्ये गणेश विसर्जन करताना चार जण बुडाले