Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Sanjay Dashrath Ghodke passed away:पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके यांचे हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन

Sanjay Dashrath Ghodke passed away:पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके यांचे हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन
, शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (14:48 IST)
Sanjay Dashrath Ghodke passed away: उद्धव ठाकरे गटातील विद्यमान तालुका प्रमुख आणि पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष संजय दशरथ घोडके यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले. ते 60 वर्षाचे होते. 
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

आज सकाळी त्यांना अस्वस्थता जाणवत असल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिक कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 
 
पंढरपूर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणाहून घोडके यांनी राजकारणाच्या जोरावर पंढरपूर नगरपरिषदेत शिवसेनेचे 6 नगरसेवक निवडून आणले. काही काळापर्यंत त्यांनी पंढरपूरचे नगराध्यक्ष म्हणून काम केले. शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण, 20 टक्के राजकारण ब्रीदवाक्य लक्षात ठेवत त्यांनी आपले कार्य केले. गोरगरिबांचे ,राजकारणात, समाजकारणात, निराधारांचे मामा म्हणून त्यांना ओळखायचे. 

त्यांनी धर्मवीर आनंद दिघे कला व क्रीडा मंडळ, स्व. मीनाताई ठाकरे नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना केली. त्यांनी परीट समाजाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्षपदी कार्य केले. त्यांनी घोरगरिंबांसाठी आणि त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचलला. त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. संजय दशरथ घोडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
 Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Gautami Patil: नाशिकात शाळेच्या पटांगणात गौतमी पाटीलचा डान्सचा कार्यक्रम