केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मनसर, नागपूर येथे देशातील पहिल्या बायो-बिटुमेन आधारित राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन केले. मनसर येथील राष्ट्रीय महामार्ग 44 वर असलेल्या मनसर-नागपूर बायपासवर असलेला हा महामार्ग पिकांच्या अवशेषांपासून बनवलेल्या बिटुमिनचा वापर करून तयार करण्यात आला आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे.
देशातील पहिला राष्ट्रीय महामार्ग नागपूर, महाराष्ट्र येथे लिग्निनच्या मदतीने बायो-बिटुमेन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. शनिवारी या महामार्गाच्या उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, “भविष्यात शेतकरी हायड्रोजन उत्पादन करू शकले पाहिजेत, हा आमचा उद्देश आहे.”
केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पुढे म्हणाले, “सरकारने जेव्हा कॉर्नपासून इथेनॉल बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्या वेळी कॉर्नची किंमत 1,200 रुपये प्रति क्विंटल होती. यानंतर जेव्हा आम्ही त्यातून इथेनॉलचे उत्पादन सुरू केले तेव्हा इथेनॉलची किंमत 2,400 रुपये प्रति क्विंटल झाली. यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला आहे.”
बायो-बिटुमेन म्हणजे काय?
बायो-बिटुमेन हे नूतनीकरणयोग्य स्त्रोतांकडून बायो-आधारित बाईंडर आहे. हे रस्ते आणि छप्पर बांधण्यासाठी वापरले जाते. बायो-बिटुमेन वापरल्याने पर्यावरणावरील परिणाम कमी होतो. सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट (CRRI) आणि इंडियन पेट्रोलियम इन्स्टिट्यूट, डेहराडून यांनी भाताच्या पेंढ्यापासून बायो-बिटुमन विकसित केले आहे. एक टन पॅराली तून 30 टक्के बायो-बिटुमेन, 350 किलो बायोगॅस आणि 350 किलो बायोचार तयार होतो