Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आरटीओ गैरव्यवहार प्रकरणाची चौकशीसाठी पाच दिवसाची मुदतवाढ, आतापर्यंत १२ जणांची चौकशी

आरटीओ गैरव्यवहार प्रकरणाची चौकशीसाठी पाच दिवसाची मुदतवाढ, आतापर्यंत १२ जणांची चौकशी
, बुधवार, 2 जून 2021 (08:14 IST)
प्रादेशीक परिवहन विभागाच्या कथित आर्थिक गैरप्रकाराबाबत सुरू असलेल्या चौकशीस पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी पाच दिवसांची मुदतवाढ दिली आहे. अद्याप या प्रकरणी चौकशी करणे बाकी असल्याने आज ही मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी परिवहन विभागाचे सहसचिव प्रकाश साबळे यांच्यासह तक्रारदार गजेंद्र पाटील यांची चौकशी केली. 
 
गेल्या पाच दिवसात १२ जणांची चौकशी झाली मुदतवाढ मिळाल्याने संबधीतांना पुन्हा चौकशीचे समन्स बजावली जाणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागातील गैरव्यवहाराचे आरोपावरुन चर्चेत आलेले निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील आज हजर झाले. उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने जबाब घेतला. .सोमवारी दुपारी पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मंगळवारी चौकशीसाठी पून्हा बोलावले होते. पाटील यांच्याबरोबर परिवहन विभागाचे सहसचिव प्रकाश साबळे यांचीही चौकशी झाली.
 
प्रादेशिक परिवहन विभागातील कथित गैरव्यवहार प्रकरणात नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाने आतापर्यंत १२ जणांचे जबाब नोंदविले आहेत. त्यात परिवहन आयुक्तांचाही समावेश आहे.  पदोन्नती आणि बदल्यांमध्ये कोट्यवधी भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप निलंबित मोटर वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला बगल देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवून या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे (सीबीआय) चौकशी करावी, अशी याचिका निलंबित गजेंद्र पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व झेडपीमध्ये ६ जूनला साजरा होणार हा दिन