पुणे : राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2 हजार 100 इंटर्न डॉक्टर्स उद्यापासून संपावर जाणार आहे. यांची मासिक विद्यावेतन अर्थातच स्टायपेंड 6 हजारावरून 15 हजार वाढून मिळण्याची मागणी आहे. यामुळे रुग्णालयातील वैद्यकीय सेवांवर त्याचा परिणाम होईल.
एम. बी. बी. एस. हा साडेचार वर्षाचा वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अभ्यासक्रमाचा भाग आणि प्रत्यक्ष रुग्णसेवेचा येण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याच महाविद्यालयात एक वर्षाची इंटर्नशिप करावी लागते. यामध्ये त्यांना वरीष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तातडीचा विभाग (कॅजुल्टी) सह इतर विभागात काम करावे लागते. प्रत्यक्षात 12 तास काम करन्याचा नियम असताना प्रत्यक्षात 17- 18 तास काम केले जाते.
या कामासाठी त्यांना वैद्यकीय शिक्षण विभागाकडून महिन्याकाठी 6 हजार विद्यावेतन देण्यात येते. प्रत्यक्षात त्यामध्ये प्रत्येक वर्षी वाढ करणे अपेक्षित असताना सन 2012 पासून त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही. सूत्रा प्रमाणे सहा हजार हा खूप कमी मोबदला असून त्यामध्ये 15 हजार रुपयांची वाढ करावी यासाठी हा संप करण्यात येत आहे.