Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद

कोल्हापूरात मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद
कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईल इंटरनेट सेवा आज बंद करण्यात आली आहे. कोल्हापूरचे जिल्हादंडाधिकारी नंदकुमार काटकर यांनी हे आदेश दिले आहेत.
 
समाजामध्ये तणाव निर्माण करणाऱ्या मेसेज आणि व्हिडीओंचा सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार होऊन, जातीय तेढ निर्माण होईल. त्याद्वारे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा बिघडेल. यामुळे 3 जानेवारी 2018 रोजी रात्री 8 वाजल्यापासून 4 जानेवारी 2018 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलं आहे. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मोबाईल कंपन्यांवर भारतीय दंड संहिता आणि इतर संबंधित कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
 
भीमा कोरेगाव दगडफेकीचे कोल्हापुरात मोठे पडसाद उमटले आहेत. यानंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदुत्ववादी आणि दलित कार्यकर्ते समोरासमोर येऊ नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई: इमारतीला आग, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू